पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठा आरक्षण : महत्त्वाची लढाई आपण जिंकलो - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ओबीसींच्या आरक्षणाला किंचितही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आपण यशस्वी ठरलो. एक महत्त्वाची लढाई आपण जिंकली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदन करून सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्याच्या महाधिवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुखमंत्र्यांनी विधानसभेत हे निवेदन केले.

मराठा आरक्षण हायकोर्टाकडून वैध, टक्केवारी कमी करण्याची शिफारस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधीमंडळाने जो कायदा केला. तो न्यायालयाच्या कसोटीवर टिकला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विधान मंडळाला असा कायदा करण्याचा अधिकार आहे, हे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. मागासवर्ग आयोगाला त्यांचा अहवाल तयार करण्यासाठी जी माहिती आवश्यक होती. ती राज्य सरकारने उपलब्ध करून दिली. ही माहितीही उच्च न्यायालयाने वैध ठरविली आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के तर नोकरीसाठी १३ टक्के आरक्षण देण्याची शिफारस न्या. गायकवाड आयोगाच्या अहवालात करण्यात आली होती. त्याकडे न्यायालयाने निकालात लक्ष वेधल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

मराठा आरक्षण: आतापर्यंत काय घडलं!

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात, यासाठीचा कायदा तयार करण्यात, न्यायालयात बाजू मांडण्यात ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचे त्याचबरोबर विरोधकांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.