पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंदुरीकरांचे कीर्तन जनप्रबोधनासाठी, एका वाक्यानं वाईट ठरवू नकाः चंद्रकांत पाटील

इंदुरीकर महाराज आणि चंद्रकांत पाटील

इंदुरीकर महाराजांचे कीर्तन हे जनप्रबोधनासाठी असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते कीर्तन करत आहेत. मी अनेकवेळा त्यांच्या कीर्तनाला गेलो आहे. त्यांचे वक्तव्य समर्थनीय नाही. पण एका वाक्याने व्यक्तीला वाईट ठरवू नये असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर माध्यमांना त्यांनी सल्लाही दिला. एका वाक्याने माणसाची राख करु नका, असे त्यांनी म्हटले आहे. 

भारताच्या विकासदराच्या अंदाजात मूडीजकडून आणखी कपात

यावेळी ते पुढे म्हणाले की, आमची भूमिका कधीच बदलेली नाही. आम्ही सरकार पाडणार असे कधीच म्हटले नव्हते. यांच्यातील विसंवादामुळेच हे सरकार पडेल, हे आम्ही पूर्वीपासून म्हणतो. 

महिलेच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला मुंबईत अटक

आम्हाला सत्तेचे स्वप्न पडत असल्याचे ते म्हणत आहेत. परंतु, त्यांनाच पाच वर्षे स्वप्न पडत होते. सत्तेसाठी ते दबा धरुन बसले होते. आम्हाला सत्ता-बित्ता काही विशेष नाही. आम्ही इतकी वर्षे विरोधातच राहिलो आहेत. 

हेरगिरी प्रकरणी नौदलाच्या ११ कर्मचाऱ्यांना अटक

राष्ट्रवादीचे नेते वारंवार खोटे बोलले. विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला असे म्हणत होते आणि ते सत्तेत बसले. त्यांनी जनादेशाचा अपमान केला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.