पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मेगाभरतीचा निर्णय कोअर कमिटीचा, माझ्या एकट्याचा नाही'

चंद्रकांत पाटील

मेगा भरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली आहे. मेगा भरती ही मेगा चूक होती, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले होते. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याची माहिती शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. जे-जे भाजपमध्ये आले त्यांचा आम्हाला फायदा झाला. त्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. 

जावेद अख्तर- शबाना आझमीच्या गाडीला मुंबई- एक्स्प्रेसवेवर अपघात

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत असे सांगितले की, 'मी जे बोलतोय त्याचा विपर्हास केला जात आहे. आकुर्डीतील माझ्या वक्तव्याचा विपर्हास केला गेला. आमचा पक्ष कोणाची मालकी होत नाही. तो कार्यकर्त्यांच्या मालकीचा आहे. मेगाभरतीचा निर्णय कोअर कमिटीचा आहे. माझ्या एकट्याचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

'...तर राहुल गांधींना सर्वात आधी अंदमानच्या तुरुंगात पाठवावे लागेल'

दरम्यान, आमच्या पक्षात जुन्यांना डावलले अशी काही चर्चा नाही. विधानसभा निवडणुकीला १६४ तिकीटं वाटली. त्यातील २५ तिकीटं भाजपमध्ये आलेल्या नव्या लोकांना वाटली. निवडून आले ते पक्षासोबत आहेत आणि जे निवडून आले नाही ते सुध्दा पक्षातच आहेत, असे त्यांनी सांगितले. तसंच, जे-जे भाजपमध्ये आले त्यांच्या येण्याचा आम्हाला अभिमान आहे पस्तावा नाही, असे त्यांनी सांगितले. 

'विद्यापीठे ही फक्त वीटा-मातीपासून तयार झालेली नाहीत'