पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत फटका गँगला रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून नवा उपाय

मध्य रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

रेल्वे मार्गाची सुरक्षा विचारात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी मनोरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवर काही उपनगरीय रेल्वे स्थानकांजवळ हे मनोरे उभारण्यात येणार आहेत. प्रामुख्याने रेल्वे मार्गावरून होणारी गाड्यांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवणे, रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवणे आणि चोरट्यांवर लक्ष ठेवणे हे मुख्य काम या माध्यमातून केले जाईल.

अशोक चव्हाणांची बोलण्याची पध्दत चुकीची: नवाब मलिक

कल्याण आणि टिटवाळा स्थानकादरम्यान मनोरा उभारण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवणे, तेथून येण्या-जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर लक्ष ठेवणे ही कामे केली जातील. या मनोऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलातील एक जवान कायम तैनात असणार आहे. या जवानाकडे शस्त्र आणि एक दुर्बिणही देण्यात येईल.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे मार्गावरील गुन्हेगारी कमी करण्यासाठी हे मनोरे उभारण्यात येताहेत. अनेक ठिकाणी रेल्वेच्या दारात उभे असलेल्या प्रवाशांचे सामान खाली थांबलेल्या चोरट्यांकडून खेचले जाते. या स्वरुपाचे कृत करणाऱ्या फटका गॅंगला रोखण्यासाठीही हे पाऊल उचलण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी रेल्वे रुळांवर कोणी समाजकंटक आला तर त्यालाही या माध्यमातून रोखणे शक्य होईल. 

CAA नुसार नागरिकत्व मागणाऱ्यांना धर्माचा पुरावा द्यावा लागणार

ठाण्यानजीक पारसिक बोगद्याजवळ आणि वडाळा स्थानकावरही मनोरा उभारता येईल का, याचीही चाचपणे रेल्वेकडून केली जात आहे. रेल्वेकडून फटका गँगला रोखण्यासाठी विद्याविहार ते घाटकोपर या दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे आधीच बसविण्यात आले आहेत.