पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ठरलं... मध्य रेल्वेची पहिली AC लोकल या मार्गावर धावणार

मध्य रेल्वे एसी लोकल

मध्य रेल्वेवरील पहिली वातानुकूलित (एसी) लोकल नक्की कोणत्या मार्गावर धावणार असा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून विचारला जात होता. अखेर याचे उत्तर मिळाले आहे. मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते पनवेल मार्गावर धावेल. सध्या या मार्गावर या गाडीची चाचणी घेण्याचे काम सुरू आहे.

गौरी लंकेश हत्येप्रकरणी आरोपी ऋषिकेश देवडीकरला बेड्या

या मार्गावरील सध्याची लोकलची एक फेरी कमी करून त्या जागी एसी लोकल धावणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या मार्गावर एसी लोकलच्या एकूण १६ फेऱ्या असतील. त्यापैकी सहा फेऱ्या या गर्दीच्या वेळी असतील, अशी माहिती मिळाली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल म्हणाले, ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकल धावेल. सध्या चाचणी आणि पूर्वतयारी करण्याचे काम सुरू आहे. ही सेवा नक्की कधीपासून सुरू होणार याची तारीख अद्याप ठरलेली नाही. रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर तारीख जाहीर केली जाईल.

दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला अन् हे पेढे वाटत फिरुन राहिले : फडणवीस

डिसेंबर २०१९ मध्येच नवी एसी लोकल मध्य रेल्वेला मिळाली आहे. त्यानंतर तीन आठवडे त्याची चाचणी सुरू होती. या लोकलच्या डब्यांची उंची, त्यातील वातानुकूलन यंत्रणा आणि बसण्याची व्यवस्था या सगळ्यांचा विचार चाचणीमध्ये करण्यात आला आहे. मध्य रेल्वेला मार्च महिन्यात आणखी सहा एसी लोकल मिळणार आहेत.