पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लेव्हल क्रॉसिंग गेटमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कळवा-खारेगाव दरम्यान असलेले लेव्हल क्रॉसिंग गेट जास्त वेळ सुरु राहिल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. 

मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान आणि दादर परिसरात जमावबंदी लागू 

कळवा येथील लेव्हल क्रॉसिंग गेट जास्त काळ सुरू ठेवल्याने कल्याण-ठाणे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. लेव्हल क्रॉसिंग गेट जास्त वेळ सुरु ठेवल्यामुळे लोकल थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे कल्याणकडे जाणारी आणि ठाण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. बुधवारी देखील या कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. 

पी. चिदंबरम यांना आज सीबीआय कोर्टात केले जाणार हजर