पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आंबिवलीजवळ डंपरची रेल्वेगेटला धडक

रेल्वेगेटला डंबरची धडक

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंबिवलीजवळ वाळूच्या डंपरने रेल्वेगेटला धडक दिल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे कल्याण ते कसारा दरम्यानची अप आणि डाऊन लोकलसेवा ठप्प झाली होती. सध्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र लोकल वाहतूक पाऊन तास उशिराने सुरु आहे. त्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे. 

राहुल गांधी अन् प्रियांका गांधी यांना अमित शहांनी दिले चॅलेंज

टिटवाळा ते आंबिवली स्थानका दरम्यान असलेल्या रेल्वे फाटकाला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वाळूच्या डंपरने धडक दिली. त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे कसारा ते कल्याण दरम्यानची लोकलसेवा ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईच्या दिशेला कामासाठी येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली.

पाकविरुद्धच्या युद्धांचे दाखले देत काँग्रेसने साधला PM मोदींवर

डंपर धडकल्यामुळे ओव्हरहेड वायरच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला होता. दुरुस्तीचे काम सध्या पूर्ण झाल्यानंतर सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पहिली लोकल रवाना झाली. लोकलसेवा सुरु झाली असली तरी सुध्दा वाहतूक उशिराने सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सध्या पाऊन तास उशिराने सुरु आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील झाला आहे. 

महाआघाडी सरकारच्या खातेवाटपासंदर्भात पवार म्हणाले की, ...

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:central railway service affects after a vehicle has dashed the level crossing boom near ambivali