पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी

प्रातिनिधिक छायाचित्र

मध्य रेल्वेची कल्याण-डोंबिवली दरम्यानची लोकलसेवा आज चार तास बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने कल्याण ते कर्जत-कसारा, सीएसएमटी ते डोंबिवली, ठाणे-डोंबिवली दरम्यान २० मिनिटाच्या अंतराने विशेष लोकल सेवा सुरू ठेवली आहे. मात्र या लोकल उशीरानं धावत असल्यानं किंवा ट्रेनमध्ये चढायलाच जागा नसल्यानं प्रवाशांची मोठी गर्दी डोंबिवली, कल्याण स्थानकात पाहायला मिळत आहेत.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केडीएमटीची विशेष बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कल्याण डोंबिवली पालिका परिवहनच्या विशेष बससेवा प्रवशांच्या सोयीसाठी उपलब्ध आहेत. केडीएमटीने कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी साडेनऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत विशेष वाढीव २० बस सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र पर्यायी वाहतूक व्यवस्था असूनही प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. बससेवा किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था ही अपूरी पडत आहेत. बस गर्दीनं खचाखच भरल्या आहेत. २० मिनिटांहून अधिक अंतरानं ट्रेन धावत असल्यानं लोकलला मोठी गर्दी आहे. प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यास मार्ग नसल्यानं प्रवाशीही संतप्त आहेत.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेतल्यानं बुधवारी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ वा. पर्यंत मध्य  रेल्वेची कल्याण-डोंबिवली दरम्यानची लोकलसेवा बंद राहणार आहे. मेगाब्लॉकमुळे १२४ लोकल, १६ लांब पल्ल्याच्या गाडय़ा चार तासांच्या अवधीत रद्द करण्यात आल्या आहेत.

'शरद पवारांनी आम्हाला जिंकण्याची प्रेरणा दिली'

रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस 
11030 कोल्हापूर- सीएसएमटी सह्याद्री एक्स्प्रेस प्रस्थान दिनांक 24.12.2019
51154 भुसावल-सीएसएमटी पॅसेंजर प्रस्थान दिनांक 24.12.2019
11010 पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
22102 मनमाड-सीएसएमटी राज्यरानी एक्स्प्रेस
12124 पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
12110 मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस
12118 मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस
12072 जालना- दादर जनशताब्दी एक्स्प्रेस
12117 एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस
11009 सीएसएमटी- पुणे सिंहगड एक्स्प्रेस
12123 सीएसएमटी पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
12109 सीएसएमटी मनमाड़ पंचवटी एक्स्प्रेस
22101 सीएसएमटी - मनमाड राज्य रानी एक्स्प्रेस
12071 दादर- जालना जनशताब्दी एक्स्प्रेस
51153 सीएसएमटी- भुसावळ पॅसेंजर गाड़ी
11029 सीएसएमटी- कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस

अमृता फडणवीस-शिवसेना वादविवादाचा सामना संपता संपेना

खालील गाड्या मुंबईकडे जाताना कर्जत-पनवेल-दिवा मार्गे जातील.
12220 सिकंदराबाद-एलटीटी एक्स्प्रेस
11024 कोल्हापूर- सीएसएमटी सह्याद्री एक्स्प्रेस
17032 हैदराबाद- सीएसएमटी एक्स्प्रेस
11042 चेन्नई- सीएसएमटी एक्स्प्रेस 

'NPRसाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही, जनतेवर आमचा पूर्ण विश्वास'