पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाटणा एक्स्प्रेसचे इंजिन हटवले; मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. कल्याणवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानका दरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होती. मुंबईकडे येणाऱ्या पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होती. मध्य रेल्वे प्रशासनाकडून इंजिन दुरुस्ती करुन ते हटवण्यात आले आहे. वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 

ते काय करतात मला बघायचंय, नव्या व्हिडिओनंतर राऊतांचे विधान

डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानका दरम्यान पाटणा एक्स्प्रेसचे इंजिन बिघाड होऊन अचानक बंद पडले. त्यामुळे पाटणा एक्स्प्रेस त्याठिकाणीच थांबली होती. या घटनेमुळे ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळण्यात आली होती त्यामुळे लोकलचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले होते. मध्य रेल्वे प्रशासनाकडून पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यानंतर पाटणा एक्स्प्रेस रवाना झाली. आता मध्य रेल्वेची लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 

डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव होणार, कोर्टाचे आदेश

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:central railway disturbed due to technical problem in patna express engine at dombivali station