पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द

मध्य रेल्वेवर ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर पुण्यापर्यंत रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. मध्य रेल्वेच्या मंकी हिल ते कर्जत दरम्यान तांत्रिक कामांसाठी अप मार्गावर १० दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या प्रगती आणि कोयना एक्स्प्रेससह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा

दरम्यान, मुंबई-कोल्हापूर मार्गावर धावणारी कोयना एक्सप्रेस फक्त पुण्यापर्यंतच धावणार आहे. तसेच इतर काही गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये मुंबईकडे येणाऱ्या आणि गावाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. 

मूसानंतर दहशतवादी संघटना सांभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा

ब्लॉक दरम्यान मुंबई -पंढरपुर-मुंबई एक्सप्रेस २४, २५, २६, २७, ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला रद्द करण्यात आली आहे. मुंबई-बिजापुर-मुंबई एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर ३१ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेस ३१ ऑक्टोबरपर्यंत दौंड-मनमाड मार्गे धावणार आहे. 

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये?

तसंच, मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, हुबळी-एलटीटी-हुबळी एक्सप्रेस, हैद्राबाद-मुंबई-हैद्राबाद एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस, नांदेड-पनवेल-नांदेड एक्स्प्रेस आणि पनवेल-नांदेड-पनवेल एक्स्प्रेस ३१ ऑक्टोबरपर्यंत पुण्यापर्यंत चालिवण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घेऊन  प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

VIDEO: कर्नाटकात पावसामुळे घर पत्त्यांसारखे कोसळले