पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

म.रे.ची अंबरनाथ ते कर्जत रेल्वे वाहतूक बंदच

ठाणे स्थानक

शुक्रवारपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं रविवारी हार्बर आणि मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. रविवारी संध्याकाळी उशीरानं ही वाहतूक पूर्वपदावर यायला सुरूवात झाली आहे. 

मेहबूबा मुफ्ती, अब्दुल्लांसह अनेक नेते नजरकैदेत; कलम १४४ 

मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली असली, तरी अंबरनाथ ते कर्जत वाहतूक कोलमडलीच आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेच्या वाहतूकीला फटका बसला आहे. सध्या ही वाहतूक सुरूळीत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच अंबरनाथपुढे कर्जतच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्ववत होईन अशी माहिती मध्य रेल्वेनं ट्विट करून दिली आहे. 

पावसाच्या थैमानामुळे अनेक एक्सप्रेस रद्द!

दरम्यान ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला  मिळाली. शनिवार पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे स्थानकात पाणी साचलं होतं त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीस याचा फटका बसला होता. रविवारी १२ तासांहून अधिक काळ मध्य रेल्वेची सेवा बंद होती. रविवारी ही सेवा सुरू झाल्यानं स्थानकात प्रवाशांची तौबा गर्दी जमली होती.