पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; आसनगाव- कसारा रेल्वेसेवा विस्कळीत

मुंबई लोकल

मध्य रेल्वेची लोकलसेवा सकाळपासून सुरळीत सुरु होती. मात्र खडवली-वाशिंद रेल्वे स्थानका दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे आसनगाव- कसारा लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.  

दोन दिवसानंतर कर्जत- बदलापूर लोकलसेवा पूर्वपदावर

आज सकाळी डाऊन मार्गावर खडवली-वाशिंद स्थानका दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. या मालगाडीच्या मागे अनेक एक्स्प्रेस गाड्या रखडल्या आहेत. तर मालगाडीच्या इंजिन बिघाडामध्ये आसनगाव- कसारा दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल डोंबिवली आणि टिटवाळा स्थानका दरम्यान रद्द करण्यात आल्या. त्यामुळे कसाराकडून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे. दरम्यान, इंजिन दुरुस्तीचे काम सुरु आहे. 

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना अटक

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मध्य रेल्वेची ठप्प असलेली बदलापूर-कर्जत लोकलसेवा आज सुरु झाली. आज पहाटे कर्जतवरुन सीएसएमटीकडे पहिली लोकल रवाना झाली. शनिवार, रविवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर-कर्जत दरम्यान रेल्वे रुळावरील खडी वाहून गेली होती. तसंच तांत्रिक बिघाड झाला होता. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर आजपासून रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.  

दिल्लीत इमारतीला भीषण आग; 5 जणांचा मृत्यू 11 गंभीर जखमी