पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम मंदिराला सरकारकडूनच उशीर - सुब्रमण्यम स्वामी

उद्धव ठाकरे आणि सुब्रमण्यम स्वामी

अयोध्येत राम मंदिर बांधायला केंद्र सरकारच उशीर करीत असल्याचे पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी रात्री मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या प्रश्नांवर उत्तरे दिली.

 

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, वर्धापनदिनी पक्षाचा निर्धार

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी सरकार योग्य निर्णय घेऊ शकते. त्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. तेथील जमिनीचा ताबा सरकारकडे आहे. सरकारला वाटेल तेव्हा या जमिनीवर सरकार मंदिराचे बांधकाम सुरू केले जाऊ शकते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याच्या नजीकच्या कुणीतरी चुकीचा सल्ला दिला आहे. मी मोदींना पत्र लिहून याबद्दलचे माझे मत कळविले आहे.

सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन यांची संसदीय कारकीर्द समाप्त

उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीमध्येही राम मंदिराच्या विषयावर आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आधीपासूनच आग्रही आहे. गेल्या रविवारीच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित १८ खासदार अयोध्येला गेले होते आणि त्यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले होते. प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादामुळे लोकसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा एकदा बहुमत मिळाले, असे शिवसेनेने म्हटले आहे.