पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा, केंद्राकडून २१६० कोटींचा मदतनिधी

महाराष्ट्रात सध्या दुष्काळसदृश्य स्थिती आहे.

दुष्काळाने होरपळत असलेल्या महाराष्ट्राला २१६० कोटी रुपयांची मदत केंद्र सरकार व एनडीआरएफच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या मदतीमुळे दुष्काळाचा सामना करत असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत केंद्राकडून राज्याला ४२४८.५९ कोटींची मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि‌्वटरवरुन ही माहिती दिली. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील आचारसंहिता शिथिल करत केंद्र व राज्य सरकारला दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर केंद्राने तातडीने मदत जाहीर केली. 

दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्रात आचारसंहिता शिथिल

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी २१६० कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले. मी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अतिशय आभारी आहे. आतापर्यंत ४२४८.५९ कोटी रूपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत, असे टि्वट फडणवीस यांनी केले आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस हे बुधवारी मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेणार आहेत. जालना व औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हिडिओ  कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी ते दुष्काळ निवारणासाठीच्या उपाययोजनांची माहिती घेतील.