पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना आता थेट घरचा रस्ता

मध्य रेल्वेवर कल्याण, इगतपूरी आणि लोणावळा येथे ओव्हरहेड वायरमध्ये विद्युत पुरवठा करणारा ग्रीड खराब झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. या घटनेमुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.

पल्लवी जोशी यांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून १२००० लुटले
 
तर, हार्बर रेल्वे मार्गावर देखील वाहतूक विस्कळीत झाली आहे. शिवडी - कॉटन ग्रीन स्टेशन दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी सव्वानऊच्या सुमारास लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे ही लोकल एकाच ठिकाणी थांबून आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या एकामागे एक उभ्या आहेत.