पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई विमानतळावर 'ध' चा 'मा', 'बॉम्बे' म्हटल्याचे ऐकले 'बॉम्ब है'

विमानतळ

नोकरी मिळू शकेल का, हे विचारण्यासाठी एका तरुणाने केलेल्या फोनमुळे मुंबईतील विमानतळाच्या नियंत्रण कक्षामध्ये काही वेळ भितीचे वातावरण पसरले. केवळ मुंबई ऐवजी तरुणाने बॉम्बे असा उल्लेख करून पुढील वाक्य उच्चारले आणि फोन घेणाऱ्याने ते चुकीच्या पद्धतीने ऐकले यावरून हा सगळा गोंधळ उडाला. १९ जुलैला दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली.

कर्नाटकात पुन्हा भाजपची सत्ता, येडियुरप्पा यांचा आजच शपथविधी

हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतलेला एक तरुण नोकरीच्या शोधात होता. त्याला गुगलवर मुंबईतील विमानतळाच्या नियंत्रण कक्षाचा फोन नंबर मिळाला. त्याने तिथे नोकरी मिळेल का, हे विचारण्यासाठी थेट फोन लावला. पण त्याने उच्चारलेले वाक्य आणि नियंत्रण कक्षातील व्यक्तीने ऐकलेले वाक्य याच्या गैरसमजुतीतून घडले ते वेगळेच. या तरुणाने फोनवर 'बॉम्बे एअरपोर्ट है?' (Bombay Airport Hai?) असा प्रश्न फोन विचारला. पण ऐकणाऱ्याने ते 'बॉम्ब है एअरपोर्ट पे' (Bomb Hai Airport Pe) असे ऐकले. आणि पुढे घडले ते ऐकल्यावर कोणालाही हसू येईल.

नियंत्रण कक्षात तो फोन घेणाऱ्याने लगचेच फोन करणाऱ्याला तो नक्की काय बोलला हे विचारले. त्यावेळी त्याने आपण 'बॉम्बे एअरपोर्ट है' असेच बोलल्याचे सांगितले. आणि तुम्ही चुकीचे ऐकले असेल, तर दिलगिरीही व्यक्त केली. हे सगळे घडल्यावर सावधगिरीचा उपाय म्हणून नियंत्रण कक्षाने सुरक्षारक्षकांना सावध केले. 

पायल तडवीच्या आत्महत्येपूर्वीच्या पत्रातून पुढे आली धक्कादायक माहिती

या संदर्भात मुंबई विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नियंत्रण कक्षामध्ये हा फोन आला होता. फोन करणाऱ्याने सुरुवातीला नोकरीसाठी जागा आहेत का, याची चौकशी केली. जेव्हा फोन करणाऱ्याला इथे केवळ नियंत्रण कक्ष असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याने वरील वाक्य उच्चारले. फोन घेणाऱ्याने ते वेगळ्याच पद्धतीने ऐकले आणि पुढे हा सगळा गोंधळ झाला. 

विमानतळावर दोन तास कसून तपासणी करण्यात आल्यानंतर संबंध फोन कॉल नेमका नव्हता, असा निष्कर्ष काढण्यात आला आणि फोन करणाऱ्याला केवळ इशारा देऊन प्रकरण बंद करण्यात आले.