पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुरख्यावर बंदी घाला आणि घूंघटवरही बंदी आणा, जावेद अख्तर यांचे मत

जावेद अख्तर

देशात बुरखा घालण्यावर बंदी आणण्यास माझा विरोध नाही. पण त्याचवेळी केंद्र सरकारने घूंघट प्रथेवरही बंदी घातली पाहिजे, असे मत प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. काही माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे मत मांडले. राजस्थानमध्ये आजही महिला चेहरा झाकण्यासाठी अंगावरील कपड्यांचा काही भाग डोक्यावरून पुढे ओढतात. या संदर्भात जावेद अख्तर यांनी घूंघट प्रथेला विरोध केला आहे.

श्रीलंकेत बुरखा बंदी मग भारतात कधी, शिवसेनेचा मोदींना सवाल

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने देशात बुरखा घालण्यावर बंदी घातली गेली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर जावेद अख्तर म्हणाले, बुरख्या संदर्भात मला फारशी माहिती नाही. मी ज्या घरात वाढलो, तिथे सर्व महिला नोकरी-व्यवसाय करीत होत्या. त्यामुळे मी माझ्या घरात कधीच कोणाला बुरखा घातलेले बघितले नाही. इराक हा कट्टर मुस्लिम देश आहे. पण तिथेही महिला चेहरा झाकत नाहीत. श्रीलंकेमध्ये जो नवा कायदा आणला आहे. त्यामध्येही चेहरा झाकण्याला विरोध करण्यात आला आहे. बुरखा घातला तरी चेहरा झाकला नाही पाहिजे, असे तेथील कायदा सांगतो. मला वाटते की बुरख्यावरही बंदी घातली जावी आणि घूंघटवरही बंदी आणावी, असे त्यांनी सांगितले.

बुरखा बंदीवर ओवेसी म्हणाले, शिवसेनेकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवाल

भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या संदर्भातही जावेद अख्तर यांनी यावेळी टिप्पणी केली. ते म्हणाले, जर प्रज्ञासिंह यांच्या शापामुळे देशभक्त पोलिस अधिकारी शहीद होऊ शकतो. तर माझी पंतप्रधानांना अशी विनंती आहे की त्यांच्या शापाचा उपयोग हाफिज सईद याच्यावरही केला गेला पाहिजे. यामुळे एक दहशतवादी तरी मरेल. महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालिन प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांचा मृत्यू मी शाप दिल्यामुळेच झाला होता, असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांनी हे वक्तव्य केले.