पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोंगरीत इमारतीचा काही भाग कोसळला; 40 ते 50 जण अडकले

मुंबईत इमारत कोसळली

मुंबईतल्या डोंगरी भागमध्ये 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. कांडेल मार्गावरील केसरबाई इमारतीचा काही भाग कोसळला आहे. इमारतीमध्ये 40 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे केले आहे. घटनास्थळावर रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. इमारत ज्या परिसरामध्ये कोसळली आहे. त्या परिसरातील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका त्याठिकाणी पोहचवण्यात अडथळे येत आहेत. इमारत कोसळण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 

पावासामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मालाड परिसरामध्ये अशीच एक घटना घडली होती. संरक्षण भिंत घरांवर कोसळून यामध्ये 29 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर 70 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. जखमींवर अद्यापही मुंबईतल्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.