उल्हासनगरमध्ये ५ मजली इमारत कोसळली. उल्हासनगर कॅम्प ३ मध्ये ही घटना घडली आहे. आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अचानक इमारत पत्त्यांसारखी कोसळली. दरम्यान, उल्हासनगर महापालिकेने कालच ही इमारत रिकामी केल्यामुळे या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
काश्मिरी जनतेला भेटू देणार का? राहुल गांधींचा राज्यपालांना खोचक सवाल
महक अपार्टमेंट असे या इमारतीचे नाव आहे. काल सकाळी ही इमारत झुकली होती. तसंच इमारतीचे दरवाजे उघडत नसल्यामुळे रहिवाश्यांनी महापालिका कर्माचारी आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली होती. त्यांनी घटनास्थळी धाव घेत इमारत रिकामी केली होती. या इमारतीमध्ये ३१ कुटुंब राहत होती.
माजी न्या. लोकूर फिजी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीपदी
आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास इमारत अचानक पत्त्यांसारखी कोसळली. इमारत रिकामी केल्यामुळे कोणी जखमी झाले नाही. मात्र या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये सामान तसेच होते. त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, इमारतीच्या शेजारी उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.