पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हा अर्थसंकल्प भारताला नवी दिशा देणार, मुख्यमंत्र्यांची आशा

देवेंद्र फडणवीस

Budget 2019 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प भारताला नवी दिशा देणारा ठरेन अशा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे. 

हा अर्थसंकल्प गाव, गरीब, शेतकरी  आणि महिलांच्या प्रगतीवर केंद्रीत आहे,  हे या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य आहे. यामुळे नक्कीच सकारात्मक बदल पहायला मिळतील. जगातील मोठी अर्थव्यवस्था होण्याचं पंतप्रधान मोंदीचं स्वप्न पूर्णत्त्वाच्या दिशेनं जाण्याचं हे नवं पाऊल असेन असा विश्वासही एएनआयशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

तर पंतप्रधान मोदींनीही या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. हा देशाला समृद्धीकडे नेणारा आणि प्रत्येकाला समर्थ बनवणारा अर्थसंकल्प अर्थसंकल्पामुळे गरिबाला बळ मिळेल आणि युवकांना उज्ज्वल भविष्य मिळेल. मध्यमवर्गीयांची प्रगती होईल. विकासकामांना पैसा मिळेल. कर रचनाही सुलभ केली असून पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येईल. भारताला न्यू इंडियाच्या दिशेने नेणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाच्या कृषीक्षेत्रात मोठा बदल होईल. या अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा आहेत असंही ते म्हणाले.