पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोंबिवलीजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

मुंबईतील लोकल अपघातातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज पुन्हा लोकलमधील गर्दीचा आणखी एक बळी गेला आहे. डोंबिवली- कोपर स्थानका दरम्यान धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. २२ जुलै रोजी कोपर-दिवा स्थानका दरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. 

'स्त्री-पुरुष समानतेसाठी तिहेरी तलाक विरोधी कायदा आवश्यक'

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव कुमार असं या २६ वर्षाच्या तरुणाचे नाव आहे. शिव डोंबिवलीमध्ये राहतो. नेहमीप्रमाणे तो आज कामासाठी निघाला होता. कर्जतवरुन सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल त्याने पकडली. मात्र लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे तो दरवाज्यावरच थांबला होता. डोंबिवली- कोपर स्थानका दरम्यान येताच त्याचा तोल गेला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत शिवचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. 

अर्थ मंत्रालयातून बदलीनंतर गर्ग यांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय

गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. लोकलमधील गर्दीमुळे रोज अपघात होतात आणि अनेक प्रवाशांचा नाहक बळी जातो. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावर जादा लोकल गाड्या सोडण्याची मागणी वारंवार प्रवाशांकडून केली जाते. 

राष्ट्रवादीला पुन्हा मोठा धक्का, सचिन अहिर शिवसेनेत