पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ठाण्यात घरावर दरड कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

ब्रेकिंग न्यूज

कळवा येथील एका चाळीवर दरड कोसळून वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री साडेबारा वाजता घडली. यामध्ये मृत मुलाची आई जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीरेंद्र जसवार (४०) आणि सनी जसवार (१०) असे मृत वडील आणि मुलाचे नाव असून जखमी नीलम जसवार यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दगदगीचा मुंबई-पुणे प्रवास पावसामुळे धाकधुकीचा

कळवा येथील डोंगराजवळ असलेल्या बैठ्या घरांची आदर्श चाळ आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे डोंगरावरील दरड या चाळीतील एका घरावर कोसळली. यात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला तर आई जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचे कर्मचारी, महापालिका कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाळीतील २० कुटुंबातील ७० जणांना ज्ञानगंगा शाळेत या सुरक्षितस्थळी हलवले.

चालकाच्या सतर्कतेमुळे देवगिरी एक्स्प्रेसचा अपघात टळला