पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेना नगरसेवक हत्याप्रकरणः मुंबई हायकोर्टाकडून अरुण गवळीची जन्मठेप कायम

अरुण गवळी

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. मार्च २००७ मध्ये जामसंडेकर यांची त्यांच्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गवळीसह ११ जणांना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आहे. 

अरुण गवळीसह सर्व आरोपींविरोधात मोक्का नुसार खटला चालविण्यात आला होता. कमलाकर जामसांडेकर यांचा सदाशिव सुरवे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर गुरवेने अरुण गवळीच्या गँगमधील दोघांना जामसांडेकर यांच्या खूनाची सुपारी दिली होती. त्यांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने या खुनासाठी ३० लाखांची सुपारी मागितली होती. 

'अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास माझा अजिबात विरोध नाही'

सदाशिवने होकार दिल्यावर गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसांडेकर हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितले. गोडसेने नवे शूटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव या दुसऱ्या साथीदाराकडे दिले. श्रीकृष्णने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी त्यांनी आगाऊ रक्कम म्हणून प्रत्येकी २० हजार रुपये दिले. त्यानंतर २ मार्च २००७ ला जामसांडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या केली.

राजकीय स्थैर्यासाठी लोकांचा भाजपवरच विश्वास - नरेंद्र मोदी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bombay High Court upholds the life imprisonment of gangster Arun Gawli murder of Shiv Sena corporator Kamlakar Jamsandekar