पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा घटनात्मकदृष्ट्या वैधच - मुंबई हायकोर्ट

मुंबई उच्च न्यायालय

एकापेक्षा अधिकवेळा बलात्काराच्या आरोपात दोषी सिद्ध झालेल्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३७६ (इ) मध्ये करण्यात आलेली सुधारणा घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. या संदर्भात करण्यात आलेली याचिका न्या. बी. पी धर्माधिकारी आणि न्या. रेवती मोहिते यांनी फेटाळून लावली.

मुंबईतील शक्ती मिल कपाऊंड सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींनी त्यांना ज्या कलमांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याच कलमाच्या घटनात्मक वैधतेबद्दल याचिकेद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, न्यायालयाने ही याचिकाच फेटाळली. 

पालिका उपायुक्त निधी चौधरींचे महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त टि्वट, राष्ट्रवादीची निलंबनाची मागणी

भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३७६ (इ) नुसार एकापेक्षा जास्त वेळा बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. २०१२ मध्ये दिल्लीत २३ वर्षीय तरुणी निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला होता. यामध्ये या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. या संपूर्ण घटनेनंतर देशभरात जनक्षोभ उसळला होता. त्या पार्श्वभूमीवर संसदेने भारतीय दंडविधान संहितेतील कलमांमध्ये सुधारण करीत कडक शिक्षेची तरतूद केली होती. याच कलमांनुसार शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

भारतीय दंडविधान संहितेतील कलम ३७६ (इ) हे घटनेतील तरतुदींच्या विरोधात नाही, असे आमचे मत आहे. त्यामुळेच ते संबंधित खटल्यामध्ये बाजूला काढता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.