पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक: वाधवान पितापुत्रांची सुटका, निवासस्थानी कैदेत ठेवणार

राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी वाधवान पितापुत्रांची तुरुंगातून सुटका करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. आज याप्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने वाधनवान पितापुत्रांची आर्थर रोड जेलमधून सुटका करण्यास सांगितले. तसंत दोघांना त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी कैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

'जाणता राजा'च्या उपाधीवरुन शरद पवारांनी साताऱ्यात केलं हे भाष्य

दरम्यान, एचडीआयएलकडून पीएमसी बँकेचे पैसे वसूल करण्यासाठी कोर्टाने एक मोठे पाऊल उचलले आहे. एचडीआयएलच्या मालमत्तेची विक्री करण्यासाठी मुंबई हायकोर्टाने तीन सदस्यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश एस राधाकृष्णन हे या समितीचे प्रमुख असणार आहेत. या समितीला ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. 

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवणार'

तसंच, या समितीला कामकाज करण्यास कुठलाही अडथळा येऊ नये तसंत कामकाज करण्यास सुविधा मिळावी यासाठी वाधवान पितापुत्रांना वांद्रे येथील निवासस्थानी ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. वाधवान यांच्या निवासस्थानी दोन पोलिस बंदोबस्तावर असणार आहे. या पोलिसांचा खर्च द्यावा असे हायकोर्टाने निर्देशात सांहितले आहे. तसंच, वाधवान यांना या समितीला सर्वतोपरी सहकार्य करावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत. 

राहुल गांधींनी रोज १५ तास पक्ष कार्यालयात काम करावे - संजय राऊत