पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पर्यावरणवाद्यांच्या पदरी निराशा, निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

आरेतील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी आमने-सामने आले आहेत.

आरे कॉलनीतील वृक्ष तोडीप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करावा यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. २६५६ वृक्षांना वाचवण्यासाठी आंदोलन करत असलेल्या कार्यकर्ते, सामाजिक संघटनांना सलग दुसऱ्या दिवशी झटका बसला. मुंबई मेट्रो कॉर्पोरेशननेही (एमएमआरसी) नवीन नोटीस जारी करण्याच्या कार्यकर्त्यांचा दावा फेटाळला आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३८ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. 

वृक्षतोड प्रकरणाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर कार्यकर्त्यांनी शनिवारी नवीन याचिका दाखल केली होती. या नव्या याचिकेवरही मुंबई उच्च न्यायालयाने दखल देण्यास नकार दिला. न्यायालयाने याचिकार्त्यांना सरन्यायाधिशांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. 

आरे कॉलनीमध्ये जमावबंदीचे आदेश, २९ जण अटकेत, मोठा पोलिस बंदोबस्त

दरम्यान, आरेतील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी आमने-सामने आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३८ लोकांना अटक करण्यात आली आहे. तर ५५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bombay High Court has refused to entertain urgent mentioning by Aarey activists to stay the ongoing tree cutting