पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राधाकृष्ण विखे, क्षीरसागर, महातेकर यांना हायकोर्टाची नोटीस

मुंबई हायकोर्ट

कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही राज्य मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांमध्ये आपली बाजू प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सरकारच्या टीकाकारांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा, काँग्रेसचे मागणी

विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही गेल्या आठवड्यात राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद देण्यात आले होते. नियमानुसार मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर संबंधिताला पुढच्या सहा महिन्यांत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यपद मिळणे आवश्यक असते. महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होते आहे. या पार्श्वभूमीवर या तिघांना मिळालेल्या मंत्रिपदाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. 

या प्रकरणी पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bombay High Court has issued notice to Radhakrishna Vikhe Patil Jaydutt Kshirsagar and Avinash Mahtekar