पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेट्रो-३ कारशेडचा मार्ग मोकळा; सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या

आरे कॉलनी

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. आरेमधील कारशेडला विरोधातल्या सर्व याचिका मुंबई हाय कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे मेट्रो - ३ चे कारशेड आरेमध्येच होणार आहे. मेट्रोच्या कारशेडला विरोध करत पर्यावरणवाद्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या होत्या. यावर सुनावणी करताना कोर्टाने या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.

PMC बॅंकेच्या तपासात EDची एंट्री, मुंबईत सहा ठिकाणी छापे

आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरणानं दिलेली वृक्षतोडीची परवानगी कोर्टाने वैध ठरवली आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांना मुंबई हाय कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरे जंगलातील २ हजार ७०० झाडे तोडण्यात येणार आहे. या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमीसह राजकीय पक्षांनी देखील विरोध केला होता. काही पर्यावरण प्रेमींनी याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र या सर्वांना कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. 

नागपूरमध्ये भाजपचे शक्तिप्रदर्शन, देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज

दरम्यान, आरेतील वृक्षतोडीला विरोध करत शिवसेनेचे नेते आणि पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हायकोर्टात अर्थहीन याचिका दाखल केली होती. त्यांना देखील हायकोर्टाने दणका दिला आहे. हायकोर्टाने यशवंत जाधव यांना ५० हजारांचा दंड ठोठावला आहे.