पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार, महादेव जानकरांचा दावा

संजय दत्त

हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षात (रासप) येणार असल्याचा दावा या पक्षाचे प्रमुख आणि कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. रासपचा महायुतीत समावेश आहे.

रासपचा रविवारी १६ वा वर्धापन दिवस होता. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात जानकर यांनी ही घोषणा केली. यावेळी भाजपच्या नेत्या आणि ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या. 

संजय दत्तचा ‘बाबा’ चित्रपट ‘गोल्डन ग्लोब्ज'मध्ये

वर्धापन दिनाच्या वेळी उपस्थितांना संजय दत्तची एक व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. यात संजय दत्त म्हणाला की, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे मी अभिनंदन करतो. जानकर हे माझे भाऊ, मित्र आहेत. मी मुंबईत असतो तर कार्यक्रमाला नक्की आलो असतो. 

मराठा आरक्षणासाठी ब्राह्मण मुख्यमंत्र्यांना जन्म घ्यावा लागलाः जानकर

ही व्हिडिओ क्लिप दाखवल्यानंतर जानकर म्हणाले की, नुकताच तुम्ही बिग बॉस..मोठ्या भावाला पाहिलं. येत्या २५ सप्टेंबरला संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार आहेत. सध्या ते दुबईमध्ये आहेत. जर ते मुंबईत असले असते तर ते निश्चितच आपल्या मेळाव्यात सहभागी झाले असते, असा दावाही त्यांनी केला. 

'केजीएफ २' मध्ये संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत

दरम्यान, १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगून १ मे २०१६ रोजी संजय दत्तची कारागृहातून मुक्तता झाली होती. त्यानंतर तो उत्तर मुंबईतील दिंडोशी येथे भाजपच्या व्यासपीठावर दिसला होता. त्यावेळी तो भाजपमध्ये जाणार असल्याची अफवा पसरली होती. 

महायुतीचं त्रांगडं: 'कमळा'वर लढण्यास खोतांचा होकार, जानकरांचा नकार

विशेष म्हणजे संजय दत्तचे घराणे पूर्वीपासून काँग्रेसचे समर्थक राहिले आहे. दरम्यान, रासपचा राज्यात प्रभाव वाढला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्ष भाजपकडे किमान ५७ जागांची मागणी करणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.

जानकरांना ५० कोटींची खंडणी मागितली, ५ जणांना अटक