पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही: संजय दत्त

संजय दत्त

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केला होता. मात्र संजय दत्त याने महादेव जानकर यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश करत नसल्याचे संजय दत्त याने स्पष्ट केले आहे.

ट्रम्पसमोर मोदी म्हणाले, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा, आमचं आम्ही बघू!

संजय दत्त याने असे सांगितले की, 'मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करत नाही. जानकर हे माझे चांगले मित्र आणि माझ्या भावासारखे आहेत. मी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो.' असे सांगत संजय दत्त याने रासपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. 

'पुढची २५ वर्षें या देशात भाजपचीच सत्ता असणार'

राष्ट्रीय समाज पक्षाचा २५ सप्टेंबर रोजी १६ वा वर्धापन दिवस होता. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात जानकर यांनी संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमावेळी जानकरांनी संजय दत्तची एक व्हिडिओ क्लिप दाखवली. यात संजय दत्त म्हणाला की, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे मी अभिनंदन करतो. जानकर हे माझे भाऊ, मित्र आहेत. मी मुंबईत असतो तर कार्यक्रमाला नक्की आलो असतो. 

मोदी-ट्रम्प भेटीची इम्रान खान यांना धास्ती

दरम्यान, ही व्हिडिओ क्लिप दाखवल्यानंतर जानकर यांनी सांगितले होते की, नुकताच तुम्ही बिग बॉस..मोठ्या भावाला पाहिलं. येत्या २५ सप्टेंबरला संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार आहेत. सध्या ते दुबईमध्ये आहेत. जर ते मुंबईत असले असते तर ते निश्चितच आपल्या मेळाव्यात सहभागी झाले असते, असा दावा जानकरांनी केला होता. 

शेअर बाजारात 'अच्छे दिन', सेन्सेक्समध्ये ८०० अंकांची उसळी