पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माहिम समुद्रकिनाऱ्यावर सुटकेसमध्ये सापडले मानवी शरिराचे तुकडे

सुटकेसमध्ये सापडले मानवी शरिराचे तुकडे

मुंबईतील माहिम समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये मानवी शरिराचे तुकडे सापडल्याने खळबळ उडाली. सोमवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास मगदूम शहा बाबा दर्गाच्या पाठीमागे समुद्रकिनाऱ्यावर ही सुटकेस आढळली. सुमद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी ही सुटकेस पाहिली असता त्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर माहिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

जेव्हा नासाने मानली हार तेव्हा चेन्नईच्या इंजिनिअरने शोधला 'विक्रम'

सफेद काळ्या रंगाची अमेरिकन टुरिस्टर कंपनीची सुटकेस पाण्यावर तरंगताना दिसून आली. पोलिसांनी ही सुटकेस उघडली असता त्यामध्ये एक हात, एक पाय आणि पुरुषाचे गुप्तांग आढळून आले. मानवी शरिराचे तुकडे करुन ते काळ्या प्सास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून सुटकेसमध्ये ठेवण्यात आले होते. ही सुटकेस समुद्रातून वाहून किनाऱ्यावर आली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

एचडीएफसी बँकेची नेट बँकिंग सुविधा कोलमडली

याप्रकरणी माहिम पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. दरम्यान, पाय पुरुषाचा आणि हात महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हे शरिराचे तुकडे शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. शरिराचे अर्धवट तुकडे सापडल्यामुळे मृतदेहाचे इतर तुकडे शोधण्याचे काम मच्छिमारांच्या मदतीने केले जात आहे. 

धक्कादायक, पुण्यात सिंहगड रस्त्यावर आढळला तरुणीचा