पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेट्रो-३ साठी आरेतील २१८५ झाडे तोडणार; वृक्षतोडीला हिरवा कंदील

आरे कॉलनी

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मुंबई मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत कार डेपो उभारणीसाठी आरे कॉलनीतील जवळपास २ हजार १८५ झाडे तोडण्यात येणार आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने अखेर वृक्षतोडीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. भाजपचे चार सदस्य, तीन तज्ज्ञ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने वृक्षतोडीच्या बाजूने मतदान केले. तर शिवसेनेच्या ६ सदस्यांनी या विरोधात मतदान केले. काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सभात्याग केला तर दोन तज्ज्ञ गैरहजर राहिले. त्यामुळे ८ विरुध्द ६ मतांनी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. 

नव्या भारतामध्ये तरुणांच्या आडनावाला महत्त्व नाही - मोदी
 
गेल्या चार वर्षांपासून आरे कॉलनीतील झाडे तोडण्याला पर्यावरणवाद्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यासारख्या मोठ्या राजकीय पक्षांनी विरोध केला. मात्र गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने या वृक्षतोड प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. तर दोन काँग्रेस नगरसेवकांनी मतदान न करता सभात्याग केला. मात्र भाजपच्या चार नगरसेवकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. 

गणेशभक्तांची गर्दी पाहता तुतारी एक्स्प्रेसचे ३ डबे वाढवले

या प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या पाच तज्ज्ञांपैकी तीन तज्ज्ञांनी वृक्षतोडीच्या बाजूने मतदान केले. मात्र दोन तज्ज्ञांनी बैठकीला गैरहजेरी लावली. फक्त शिवसेनेच्या ६ सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे ८ विरुध्द ६ मतांनी या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. मंजूरी मिळाल्यामुळे आता आरे कॉलनीतील जवळपास २ हजार १८५ झाडे तोडण्यात येणार आहेत तर ४६१ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. दरम्यान, शिवसेनेने वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.   

६१ फुटांची भव्य गणेश मुर्ती, देशातील सर्वात उंच मुर्ती असल्याचा दावा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bmc tree authority has cleared the proposal to cut 2185 trees in aarey colony for metro 3