पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोना; सोबत काम करणारे २३ जण क्वारंटाईन

इटलीतील एका दाम्पत्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (संग्रहित छायाचित्र)

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी मुंबई महानगर पालिकेच्या ५२ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये तो सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. तर वरळीच्या जीजामाता नगरमध्ये तो रहायला आहे. या घटनेमुळे या सफाई कर्मचाऱ्यासोबत धारावीमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

लॉकडाऊनमुळे मोटार आणि आरोग्य विम्याच्या प्रिमियम भरण्याच्या मुदतीत वाढ

धारावीमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्याला ३० मार्च रोजी ताप आल्यामुळे त्याला अंधेरीच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्याची कोरोनाची तपासणी करण्यात आली. गुरुवारी आलेल्या तपासणी अहवालामध्ये सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या सफाई कर्मचाऱ्यावर सध्या उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आणि धारावीमध्ये त्याच्यासोबत काम करणार्‍या २३ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

कोरोनाने हॉस्पिटल क्वारंटाईन होण्यापेक्षा घरी राहा - अजित पवार

दरम्यान, बुधवारी मुंबईमध्ये सर्वात मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये राहणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. २९ मार्च रोजी ताप येत असल्यामुळे त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर तो ज्या ठिकाणी राहतो ती बिल्डिंग सील करण्यात आली. तसंच त्याच्या कुटुंबातील ७ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

तयारी न करता सरकारचा लॉकडाऊनचा निर्णय, सोनिया गांधींची टीका