पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खूशखबर! मुंबईतील पाणीकपात रद्द

मुंबईतील पाणीकपात रद्द

मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गेल्या दोन महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणीकपात मागे घेतली आहे. उद्यापासून (दि.२०) हा निर्णय लागू होणार आहे. १५ नोव्हेंबरपासून पाणीकपात लागू करण्यात आली होती.

बीव्हीजी समूहाचे हनुमंतराव गायकवाड यांची १६ कोटींची फसवणूक

मुंबई शहर व उपनगराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील उपयुक्त साठ्यामध्ये आतापर्यंत सुमारे ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दि. १५ जुलै २०१९ रोजी पाणी साठ्याचा पुन्हा आढावा घेण्यात आला, तेव्हा एकूण पाणीसाठ्याच्या ४८ टक्के पाणीसाठी उपलब्ध असल्याचे आढळून आले. उर्वरित जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. अद्याप सप्टेंबरपर्यंत सुमारे 57 दिवस पावसाचे आहेत. या काळात समाधानकारक पाऊस पडल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल. 

मुंबई शहर व उपनगराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये गेल्या वर्षी पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यामध्ये १० टक्के कपात केली होती. तसेच पाणी पुरवठ्याच्या वेळेतही १५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे उपनगरातील नागरिकांना अडचणी निर्माण होत आहे. पाणीकपात रद्द व्हावी, याविषयी नगर विकास राज्यमंत्री सागर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.