पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतील दाट वस्तीचा वरळी कोळीवाडा परिसर पोलिसांकडून सील

वरळी कोळीवाडा

मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर महापालिकेनं मुंबई पोलिसांच्या मदतीनं सील केला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून  कोळीवाडा सील करण्यात आला आहे. मुंबईतील अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या परिसरापैकी हा  परिसर आहे. आज दुपारपर्यंत हा परिसर मुंबई पोलिसांकडून पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

गावी परतलेल्या मजुरांवर औषध फवारणी, जिल्हाधिकारी म्हणतात चौकशी करू

 खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या  आहेत. पोलिसांनी परिसरात बॅरिकेट्स लावले असून इथल्या लोकांना बाहेर जाण्यास किंवा इतरांना आतमध्ये येण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. तर या संपूर्ण भागाचं पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. 

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारपर्यंत मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले तीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा आता हा २१५ झाला आहे.