पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोकादायक इमारतीची नोटीस पाठवली होती; पालिकेचा दावा

डोंगरी इमारत दुर्घटना

मुंबईतील डोंगरी भागामध्ये असलेली केसरबाई इमारत कोसळून आतापर्यंत 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेमध्ये 9 जण जखमी झाले आहेत. त्याच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही इमारत 100 वर्ष जुनी असून या इमारतीला मुंबई महानगरपालिकेने 2017 साली नोटीस पाठवली होती.

'इमारत 100 वर्ष जुनी असताना धोकादायक इमारत यादीत समावेश नव्हता'

डोंगरीतील केसरबाई इमारत धोकादायक असल्याची नोटीस मुंबई महानगर पालिकेने 7 ऑगस्ट 2017 साली पाठवली होती. या नोटीसमध्ये या इमारतीला 'सी 1' म्हणून वर्गीकृत केले होते. लवकरात लवकर ही इमारत पाडण्यात यावी तसंच कोणतिही दुर्घटना झाल्यास आम्ही याला जबाबदार नाही, असं देखील या नोटीमध्ये सांगण्यात आले होते. मात्र, तरी देखील या इमारतीमध्ये जीव धोक्यात घालून 15 कुटुंब राहत होती. 

ढिगाऱ्याखालून चिमुकल्याला सुरक्षित बाहेर काढले

दरम्यान, या इमारत दुर्घटनेप्रकरणी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले की, ही इमारत 100 वर्ष जुनी आहे. तसंच ही इमारत धोकादायक असताना देखील तिचा समावेश धोकादायक इमारतीच्या यादीमध्ये नव्हता. त्याचसोबत या इमारतीचे पुनर्विकासाचे काम विकासकाला देण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली. तसंच, या दुर्घटना प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

Dongri Building Collapses Live : तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी