पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई महापालिका आर्थिक संकटात? खर्च कमी करण्याचे आदेश

मुंबई महानगर पालिका

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी मुंबई महापालिका आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी एक परिपत्रक जारी केले असून, अधिकाऱ्यांना करवसुली वाढविण्यावर आणि खर्च कमी करण्यावर लक्ष देण्यास सांगितले आहे. यासाठी काही कामे आऊटसोर्स करण्याचे त्याचबरोबर नोकर भरतीवरही स्थगिती आणण्याचे सूचित करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात अभिजीत बिचुकले रिंगणात

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी ३० सप्टेंबरला एक पत्रक काढले आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, येत्या काळात मुंबई महापालिकेवर आर्थिक अडचण ओढावण्याची शक्यता आहे. एकीकडे खर्चात खूप वाढ झाली आहे आणि दुसरीकडे उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी काय करता येईल, यासाठी सहा मुद्द्यांचा एक कार्यक्रमही या पत्रकात देण्यात आला आहे.

महापालिकेने सध्याचे मनुष्यबळ अधिक कार्यक्षमपणे वापरले पाहिजे आणि गरज असेल तरच नवीन लोकांना रोजगार दिला पाहिजे. जिथे अत्यंत गरज आहे तेथील रिक्त जागाच भरल्या जाव्यात. महापालिका हद्दीतील बागा आणि सामाजिक स्थळांची निगा राखण्यासाठी सीएसआर निधीतील रक्कम वापरण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे या पत्रकात म्हटले आहे.

फुशारक्या मारत नाही पण एक लाखाच्या फरकाने मी जिंकेन - अजित पवार

पाणी आणि मालमत्ता करासंदर्भात जे खटले प्रलंबित आहेत, ते लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी महापालिकेच्या विधी विभागालाही सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, हा प्रकार म्हणजे महापालिकेचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपला दोषी ठरविले आहे. ३० हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प असणारी महापालिका आर्थिक अडचणीत कशी काय येऊ शकते, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.