पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : मृतदेह फक्त दहन करण्याचा आदेश मागे, नवाब मलिकांनी दिली माहिती

बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून खास प्रोटोकॉल पाळण्यासंदर्भात काढलेला आदेश तासाभरात मागे घेण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त मृत व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याच्या मृतदेहाचे दहनच करण्यात यावे, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले होते. पण तासाभरात त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. महापालिकेने सुधारित परिपत्रक जारी केले असून मोठ्या जागेतील कब्रस्तानात अशा व्यक्तीला दफन करता येईल, असा बदल करण्यात आला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील  माहिती दिली आहे.

मुंबईत कोरोनाचा आणखी एक बळी; ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी जारी केलेल्या पहिल्या आदेशात, 'कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. रुग्ण कोणत्याही धर्माचा असला तरी सुद्धा त्याचा मृतदेह दहन करण्यात यावा, असा उल्लेख करण्यात आला होता. अंत्यसंस्कारादरम्यान ५ पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही. तसंच, जर एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाने मृतदेहाला दफन करण्याचा आग्रह केला तर मुंबई शहराच्या हद्दीबाहेर मृतदेह दफन करण्यास त्यांना परवानगी दिली जाईल, असे आयुक्तांनी म्हटले होते.

अश्विनी भिडे यांच्याकडे कोविड १९ प्रतिबंध व्यवस्थापनाची जबाबदारी
 
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये सोमवारी आणखी १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २२० वर पोहचला आहे. या नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे, ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूरचे प्रत्येकी १ रुग्ण आहेत. तर आज कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. यामधील एक पुण्याचा तर दुसरा रुग्ण मुंबईचा आहे. 

कोरोना: पी. चिदंबरम यांच्याकडून महाराष्ट्र सरकारला १ कोटींची मदत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bmc commissioner says all bodies of covid 19 patients should be cremated irrespective of religion