पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता राज्याचे मुख्य सचिव

अजोय मेहता (ANI)

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मेहता यांच्या नियुक्तीचे अधिकृत आदेश आज (शुक्रवारी) काढण्यात येणार असल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. विद्यमान मुख्य सचिव यूपीएस मदान (मुख्य सचिव दर्जा) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मेहता हे १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. मदान हे यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते.  लोकसभा निवडणूक सुरु असल्याने सध्या आचारसंहित लागू आहे. यामुळे राज्य सरकारने अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता.