पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BMC Budget 2020: जाणून घ्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे अर्थसंकल

मुंबई महापालिकेचा २०२०-२१ चा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना मुख्य अर्थसंकल्प सादर केला. ३३ हजार ४४१.०२ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मागच्या अर्थसंकल्पापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ९ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

महापालिका अर्थसंकल्प २०२०-२१ - 

- गोरेगाव - मुलुंड लिंक रोडसाठी ३०० कोटींची तरतूद. या प्रकल्पाच्या तरतुदीत ३ पटीने वाढ. 

मुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर; २ हजार ९४४ कोटींची तरतूद

- रस्ते सुधारणा कामांसाठी १६०० कोटींची तरतूद.

- पुलांकरिता ७९९.६५ कोटींची तरतूद. ४७ मोठ्या पुलांची दुरूस्ती आणि १८४ किरकोळ पूल दुरूस्त करणार. 

- २०१९-२० मध्ये बेस्टसाठी कमी केलेल्या दरामुळे १० टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी वाढ झाली आहे. २०१९ -२० मध्ये १९४१.३१ कोटींचे अनुदान बेस्ट उपक्रमातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी दिले होते. पुढील आर्थिक वर्षासाठी १,५०० कोटींची तरतूद. 

- आपत्कालीन विभागासाठी ५ कोटींची तरतूद.
 
- कोरोना विषाणूचा धोका मुंबईला होऊ शकतो. म्हणून २ कोटींची तरतूद. महापालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयाला देणार बळकटी. 

- आरोग्य विभागासाठी ४,२६० कोटींची तरतूद. यावर्षी अर्थसंकल्पात १४ टक्क्यांनी वाढ.

- पुरातत्व आणि नैसर्गिक विभागासाठी १८३.३० कोटींची तरतूद.

-  वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानासाठी २ कोटींची तरतूद.

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मुलाने केला भाजपमध्ये प्रवेश
 
- चौपाट्या आणि समुद्र किनाऱ्यांची सुधारणा. तसंच माहिम, वांद्रे, शीव आणि वरळी किल्ल्यांच्या पुनर्स्थापनेची कामे हाती घेणार.
 
- पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी गारगाई प्रकल्प विकसित करण्यासाठी ५०३.५१ कोटींची तरतूद.

- मुंबईत झाडांची संख्या वाढवण्यासाठी मियावकी वनीकरण पद्धतीने दाट शहरी वनीकरण करण्याचा प्रस्ताव. मियावकी पद्धतीने ४ लाख झाडे लावणार.

- उद्यान खात्यासाठी २२६.७७ कोटींची तरतूद.

- २०२० मान्सूनसाठी अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये प्रमुख नाले, किरकोळ नाले आणि मिठी नदीच्या जमीनस्तीसाठी अनुक्रमे ५० कोटी, ७० कोटी आणि १८ कोटींची तरतूद.

- महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर निवासस्थानासाठी पश्चिम उपनगरात गोरेगाव (प) येथे कार्यरत महिलांचे वसतिगृह बांधणार. यासाठी १० कोटींची तरतूद. 

- महानगरपालिका नॉन-एसी बेस्ट बसेसमधून अंध आणि दिव्यांग प्रवाशांसाठी प्रवास भाड्यात १०० टक्के सवलत प्रदान करते. यासाठी २०२०-२१ मध्ये ६ कोटींची तरतूद.

- मुंबई सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी ४०२.५५ कोटींची तरतूद 

- अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये मुंबई सांडपाणी व्यवस्थापन सुधारणा कार्यक्रमासाठी  ३२०.१६ कोटींची तरतूद.