पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर

हर्षवर्धन जाधव

माजी आमदार आणि भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी मुंबईत राज ठाकरे यांची आज (शनिवार) सकाळी भेट घेतली. राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंजवर जाधव गेले होते. यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. 

'नाईट लाईफ'मुळे महिलांची सुरक्षा धोक्यात, पोलिसांवर ताण- आशिष शेलार

हर्षवर्धन हे मनसेचे आमदार देखील होते. मनसेच्या पहिल्या १३ आमदारांपैकी ते एक आहेत. नंतर त्यांनी मनसेचा त्याग करत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेकडून ते आमदारही झाले होते. मध्यंतरीच्या काळात मराठा आंदोलनावेळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. 

कल्याण : रोजंदारीवर काम करणाऱ्यास १ कोटींचा कर भरण्याची नोटीस

लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात औरंगाबाद मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. याचा फटका खैरे यांना बसला आणि ते पराभूत झाले. या मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलाल हे निवडून आले. त्यानंतर खैरे आणि जाधव यांच्या राजकीय वैर निर्माण झाले आहे. खैरे यांनी दानवे यांच्यावरही टीका केली होती.

मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींची सुटका