पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निकालापूर्वीच भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींची २ हजार किलो मिठाईची ऑर्डर

निकालापूर्वी भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आत्मविश्वास

एक्झिट पोलच्या अंदाजानंतर भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर मुंबई मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह देखील   शिगेला पोहचला आहे. भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच विजयी जल्लोषाची तयारी सुरु केली आहे. भाजपने बोरिवलीच्या एका शॉपमध्ये मिठाईची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी शॉपमधील कर्मचारी चक्क मोदींच्या चेहऱ्याचे मुखवटे घालून लाडू आणि पेढे तयार करत आहेत. बोरीवलीच्या एका स्वीट्च्या शॉपमध्ये भाजपने तब्बल १५०० ते २०० किलो स्वीट्सची ऑर्डर दिली आहे.  

NDA ची मोठी बैठक, दिग्गज नेते सहभागी होणार
 

उत्तर मुंबई मतदार संघात काँग्रेसने बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरा असणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे गोपाळ शेट्टी रिंगणात आहेत. गोपाळ शेटट्टी नगरसेवक ते खासदार अशा आपल्या राजकीय प्रवासात एकदाही पराभूत झालेले नाहीत. उत्तर मुंबई हा त्यांचा बालेकिल्ला आहे.  

'आता पुढची तयारी', अखिलेश-मायावती यांच्यात तासभर चर्चा

उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांची निवड केली असली तरी या मतदार संघात त्यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे, अशी चर्चा निवडणुकीच्या सुरुवातीपासून रंगत आहे.  मात्र, वेगवेगळ्या एक्झिट पोलचा कल हा भाजपच्या बाजूने आले. यात उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टींचा विजय पक्का मानला जात आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJPs Gopal Shetty Mumbai North LS candidate orders Sweet Workers are excited wearing Modi jis masks and sweet preparing