पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप मेगाभरती पार्ट ३: 'हे' नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

भाजप

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. बुधवारी भाजपमध्ये तिसरी मेगा भरती होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. मंबईतल्या गरवारे क्लबध्ये दुपारी ३ वाजता मेगा भरतीचा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा; भाजपच्या वाटेवर?

भाजपच्या तिसऱ्या मेगा भरतीमध्ये मुंबईतील काँग्रेसचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह हे प्रवेश करणार असल्याचे समजते. मंगळवारी कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे इंदापूरचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp third megabharati on 11 september ganesh naik krupashankar singh and harshvardhan patil will join bjp