राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. भाजपला विरोधी पक्षात बसवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. त्यामुळे सत्ताधारी विरोधात आणि विरोधक सत्ताधारी झाले आहेत. यात शिवसेनेसोबत काँग्रेसने आघाडी करावी यासाठी महत्त्वाची भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निभावली होती. दरम्यान, राज्य विधिमंडळाचे आज एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. एकेकाळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना विधानसभेत त्यांच्यावर तुटून पडणारे सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र आज त्यांची काळजी व्यक्त केली आहे. विधिमंडळात आसन व्यवस्था करताना पृथ्वीराज चव्हाण यांची व्यवस्था लांबच्या ठिकाणी केली आहे. त्यावर मुनगंटीवार यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि माजी मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक का दिला असा सवाल विधानसभेत केला. मुनगंटीवारांच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले असले तरी ही राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे.
कामगार संघटनांच्या भारत बंदला राहुल गांधींनी असा दिला पाठिंबा
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नूतन मंत्र्यांची ओळख विधिमंडळाला करुन दिली. त्यानंतर मुनगंटीवार आसनावरुन उठले आणि त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, कोणाला मंत्री करायचे कोणाला नाही, हे मुख्यमंत्री आणि त्या सरकारवर अवलंबून असते. परंतु, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीची आसन व्यवस्था इतकी लांब करणे योग्य नाही, असे म्हटले.
आर्थिक मंदीचा परिणाम, मुंबईत सदनिकांच्या विक्रीत घट
मुनगंटीवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत व्यक्त केलेले मत हे वैयक्तिक काळजीपोटी होते की राजकीय काळजीपोटी होते, याची चर्चा सध्या रंगली आहे.