पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रकांत पाटलांसाठी देवेंद्र फडणवीस अजून मुख्यमंत्रीच!

चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत माहिती देताना...

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आणि इतर संघटनात्मक रचनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक गेले दोन दिवस मुंबईत सुरू आहे. शनिवारी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत नेमके काय घडले, याची माहिती पत्रकारांना देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख माननीय मुख्यमंत्री असाच केला. वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी ८ नोव्हेंबरलाच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर गेल्या मंगळवारी, १२ नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आता माजी मुख्यमंत्री झाले आहेत, याचा विसर चंद्रकांत पाटील यांना पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

सुरत-मुंबई विमान प्रवासात ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू, कारण अस्पष्ट

बैठकीतील घडामोडींची माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपने १६४ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी १०५ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. ५९ ठिकाणी पक्षाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. पण यापैकी बहुतांश ठिकाणी अगदी किरकोळ फरकाने आमचे उमेदवार अपयशी ठरले आहेत. पराभूत झाल्यानंतर कोणताही उमेदवार खचलेला नाही. प्रत्येक उमेदवाराची मानसिकता सकारात्मक आहे. आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिक, महापालिकेच्या निवडणुकीत जोमाने पक्षाचे काम करण्याचे या सर्व उमेदवारांनी ठरविले आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उमेदवारांना सांगितले आहे, याचाही पुनरुच्चार चंद्रकांत पाटील यांनी केला.

गोव्यात मिग विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp state president chandrakant patil still thinks devendra fadnavis is chief minister of maharashtra