पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकार हादरेल असं आंदोलन केलं: चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यातील ३५५ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात सुमारे अडीच लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. सरकार हादरेल असे आंदोलन भाजपने केले, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

दिल्ली हिंसाचार: आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू, १३० हून अधिक रुग्णालयात

ते पुढे म्हणाले, भाजपने आज एकदिवसासाठी केलेल्या आंदोलनात अन्यायग्रस्त लोक, पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी आदी सहभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणी लोकांचा सहभाग होता. हे फसवणूक करणारे सरकार आहे. जितके दिवस आहे, तितके दिवस हे सरकार आहे. दूरदृष्टी नसलेले हे सरकार आहे. 

भाजपतून निलंबित आमदाराचे विधानसभा सदस्यत्वही रद्द

सरकारला धडकी भरेल अशा प्रकारचे भाजपचे आंदोलन होते. आगामी काळात सरकारला धडकी भरेल असे आंदोलन करणार आहे. या आंदोलनानंतर लवकरच भाजप रस्त्यावर उतरणार आहे. विधिमंडळाचे सभागृह बंद पाडणे आमचा हेतू नाही, असेही ते म्हणाले. 

दिल्ली हिंसाचारः गोळीबार करणाऱ्या 'त्या' युवकाला अटक

दरम्यान, मुंबईत आंदोलनस्थळी बोलताना पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. हे सरकार घाणेरडे आहे. सरकारला भितीच्या वातावरणात ठेवले नाही तर ते न्याय मिळवून देणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. तर, उद्धव ठाकरे यांनी फक्त शरद पवारांचे ऐकू नये असा सल्ला त्यांनी दिला.