पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेनं सर्व तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या कोपऱ्यात ठेवली, चंद्रकांत पाटलांची टीका

चंद्रकांत पाटील (छायाचित्रः भाजप टि्वटर हँडल)

जनादेशाचा अनादर करत एक अभद्र आघाडी राज्यात आली आणि आपल्याला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले. शिवसेनेने दगाबाजी केली. २५ वर्षांची युती तोडली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी, मुलाला मंत्री बनविण्यासाठी धडपड सुरू केली. अनेक योजना रद्द करण्याचा सपाटा या महाविकास आघाडीने सुर केला आहे. सारथीची चौकशी लावली आहे. सर्व तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या कोपऱ्यात ठेवली आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्यात सावरकरांचा अपमान केला जात आहे. त्यांना समलैंगित म्हटले गेले. अशावेळी शिवसेना गप्प आहे. बाळासाहेबांच्या काळात अशी वक्तव्येही सहन केली जात नसत. पण सत्तेसाठी शिवसेनेने सर्व तत्वे गुंडाळल्याचे ते म्हणाले. 


नवी मुंबई येथे भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरु आहे. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली नाही. दुसऱ्यांदा झालेल्या निवडीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. 

अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा झाले दिल्लीचे मुख्यमंत्री

ते पुढे म्हणाले, गोरेगाव येथे झालेल्या अधिवेशनात ठराव मंजूर केला होता. भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील. २४ मतदार संघापैकी २३ ठिकाणी खासदार झाले. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार असे वाटले होते पण जनादेशाचा अनादर करून अनैतिक युती झाली. आपल्याला १ कोटी ४२ लाख मते मिळाली होती. शिवसेनेकडून विश्वासघात झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपदी बसावे लागले आहे.

चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १,६६५ नागरिकांचा मृत्यू

शिवसेनेने दगाबाजी केली. २५ वर्षाची युती तोडली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी मुलाला मंत्री बनविण्यासाठी धडपड सुरू केली. अनेक योजना रद्द करण्याचा सपाटा आहे. सारथीची चौकशी लावली आहे. सर्व तत्व गुंडाळून मातोश्रींच्या कोपऱ्यात ठेवली आहे. सावरकरांचा अपमान करण्यात आला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान करण्यात आला. तरीही शिवसेना गप्प राहिली. 

राज्य सरकारला सुध्दा स्वतंत्र चौकशीचा अधिकार: शरद पवार

हे सरकार आपल्याला पाडण्याची गरज नाही. परस्पर विसंवादानेच हे सरकार पडणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. रोज महिला असुरक्षित झाल्या आहेत. आमच्या सरकारमध्ये गुन्हा सिद्धतेचे प्रमाण ९ टक्क्यांहून ५४ टक्के झाले होते. सीएएची अंमलबजावणी करण्याचं नाव काढायला तयार नाहीत.

महाविकास आघाडी अंतर्गत मतभेदामुळे तुटेलः एकनाथ खडसे

या सर्वांवर अंकुश म्हणून प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचे आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरायचे आहे. राज्यपालांना शेतकऱ्यांनी फसवी कर्जमाफी बाबत पत्र लिहायचे आहे.