पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेच्या ठाम भूमिकेवर भाजपचे मौन

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. या भेटीदरम्यान  भाजपने सत्ता स्थापनेचा कोणताही दावा केलेला नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचे घोंगडे आणखी काही दिवस भिजतच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबतच्या आपल्या दाव्यावर ठाम आहेत. भाजप नेते ज्यावेळी राज्यपालांच्या भेटीला गेले त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सेनेच्या आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचे पाहायला मिळाले.

उद्धव ठाकरे म्हणतात, मला स्वतःहून युती तोडायची नाही पण...

बुधवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपने शिवसेनेच्या कोर्टात चेंडू टाकला होता. शिवसेनेसाठी २४ तास दरवाजे खुले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेने आपली भूमिका ठाम असल्याचे सांगत भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर शिवसेनेविषयीच्या प्रस्तावावर देखील बोलणे भाजपच्या नेत्यांनी टाळले. दरम्यान, राज्यातील जनतेने सरकार चालवण्यासाठी महायुतीला कौल दिला आहे. लवकरात लवकर महायुतीचे सरकार स्थापन व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. राज्यपालांशी राज्यातील सध्य परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली असून पुढे काय करायचे ते ठरवू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 

ज्यांच्या जास्त जागा त्यांचाच मुख्यमंत्री - नितीन गडकरी