पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भगवे फेटे बांधून भाजपचे विधीमंडळ परिसरात शक्तीप्रदर्शन

भगव्या फेट्यामध्ये भाजपचे आमदार

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्वाधिक उमेदवारांनी विजय मिळवत राज्यात मोठा पक्ष असल्याचे दाखवून दिले. या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी आज विधीमंडळ परिसरात शक्तीप्रदर्शन केले. भाजपच्या विधीमंडळ पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी भाजपच्या आमदारांसह नेत्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सर्व आमदार आणि नेत्यांनी भगवे फेटे बांधले होते. त्यामुळे विधीमंडळ परिसर भगवामय झाला होता. या सर्वांनी विधीमंडळ परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 

'भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरेंना फोन करणार'

विधीमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीसाठी भाजपची आज बैठक झाली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, नारायण राणे यांच्यासह भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ११ आमदारांनी अनुमोदन दिले. 

'बाप रे!, समुद्राच्या पाणी पातळीत वाढीचा मुंबईला मोठा धोका'