पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुन्हा दाखल करत संजय राऊतांना अटक करा: राम कदम

भाजप आमदार राम कदम

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले असून भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच, जोपर्यंत पोलिस संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु ठेणार, असा आक्रमक पवित्रा राम कदम यांनी घेतला आहे.

घड्याळवाले आता आमचे पार्टनर, उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर स्तुतिसुमने

भाजप आमदार राम कदम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यांचा भाजप आणि शिवभक्तांकडून जोरदार निषेध केला  जात आहे. 

PMC बँक आरोपींबाबत हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

दरम्यान, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदर करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तक होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला शिवराजायांचे वंशज म्हणणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना केले होते. त्यांच्या या वक्तव्याविरोधात गुरुवारी सातारा बंदची हाक देण्यात आली आहे. तसंच, सातारा, मंगळवेढा आणि संगमनेरमध्ये या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्याविरोधात आंदोलन सुरु आहे. 

'अनेकांना वाटत होतं मी निवृत्त होईल मात्र तसं झालं नाही'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp mla ram kadam says case must be registered against sanjay raut and he must be arrested